Skin Care Science: महिलांच्या क्रिम-सीरमचा पुरुष वापर करू शकतात का? डर्मेटोलॉजीचे विज्ञान आणि त्वचेच्या निरोगी आरोग्याचा खरा संबंध

Sameer Amunekar

स्किनकेअरला लिंग नसतं!

महिलांसाठी किंवा पुरुषांसाठी अशी विभागणी प्रामुख्याने मार्केटिंगसाठी असते. त्वचेच्या गरजेनुसार कोणतेही योग्य उत्पादन वापरता येते.

Dermatology Skin Care | Dainik Gomantak

घटक महत्त्वाचे, ब्रँडिंग नाही!

क्रिम किंवा सीरमवर ‘Women’ लिहिले आहे की ‘Men’, यापेक्षा त्यातील घटक आणि त्वचेला होणारा फायदा महत्त्वाचा असतो.

Dermatology Skin Care | Dainik Gomantak

पुरुषांची त्वचा थोडी वेगळी असू शकते

पुरुषांच्या त्वचेची जाडी आणि तेलनिर्मिती तुलनेने जास्त असू शकते. त्यामुळे काही पुरुषांना हलक्या टेक्स्चरची उत्पादने अधिक योग्य ठरतात.

Dermatology Skin Care | Dainik Gomantak

सीरम निवडताना त्वचेचा प्रकार ओळखा

तेलकट त्वचेसाठी नियासिनामाइड, कोरड्या त्वचेसाठी हायलुरॉनिक ॲसिड, तर डागांसाठी व्हिटॅमिन सी असलेले सीरम उपयोगी ठरू शकते.

Dermatology Skin Care | Dainik Gomantak

मॉइश्चरायझर कोणतेही चालू शकते!

महिलांसाठी असलेले मॉइश्चरायझर पुरुषही वापरू शकतात. मात्र ते त्वचेच्या प्रकाराला अनुरूप आणि छिद्रे बंद न करणारे (Non-comedogenic) असावे.

Dermatology Skin Care | Dainik Gomantak

सुगंध आणि सक्रिय घटकांकडे लक्ष द्या

काही उत्पादनांमधील सुगंध किंवा रेटिनॉल, AHA, BHA यांसारख्या सक्रिय घटकांमुळे संवेदनशील त्वचेला त्रास होऊ शकतो. त्यामुळे सुरुवातीला पॅच टेस्ट करा.

Dermatology Skin Care | Dainik Gomantak

सनस्क्रीन मात्र रोज लावा!

पुरुष असो वा महिला, प्रत्येकाने त्वचेचे सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करणे गरजेचे आहे. SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेले ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरा.

Dermatology Skin Care | Dainik Gomantak

चेहरा उजळ आणि चमकदार दिसण्यासाठी आहारापासून स्किन केअरपर्यंत महत्त्वाच्या टिप्स

येथे क्लिक करा