Sameer Amunekar
पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेमुळे त्वचेवर धूळ आणि प्रदूषण लवकर चिकटते. त्यामुळे, दिवसातून दोनदा सौम्य क्लिंजरने चेहरा धुवा, जेणेकरून रोमछिद्रं स्वच्छ राहतील.
पावसाळ्यात तहान कमी लागते, पण त्वचा निर्जीव दिसू नये म्हणून भरपूर पाणी प्या. तसेच, तेलकटपणा टाळण्यासाठी 'वॉटर-बेस्ड' मॉइश्चरायझरचा वापर करा.
आठवड्यातून एकदा किंवा दोनदा स्क्रब करा. यामुळे मृत त्वचा (Dead skin cells) निघून जाते आणि त्वचेला एक नैसर्गिक चमक मिळते.
ढगाळ वातावरण असले तरीही सूर्याची अतिनील किरणे त्वचेला इजा पोहोचवू शकतात. त्यामुळे घराबाहेर पडताना नेहमी 'ब्रॉड-स्पेक्ट्रम' सनस्क्रीन लावा.
पावसाळ्यात आर्द्रतेमुळे रोमछिद्रं (Pores) मोठी होतात. अल्कोहल-फ्री टोनर वापरल्याने त्वचेचा pH स्तर संतुलित राहतो आणि त्वचा फ्रेश दिसते.
केमिकलयुक्त उत्पादनांऐवजी बेसन, हळद किंवा मुलतानी मातीचा फेस पॅक वापरा. हे त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेण्यास आणि नैसर्गिक ग्लो आणण्यास मदत करतात.
झोपण्यापूर्वी चेहरा नीट धुवून 'नाईट क्रीम' किंवा 'सीरम' लावा. रात्रीच्या वेळी त्वचा स्वतःला रिपेअर (Repair) करते, ज्यामुळे सकाळी चेहरा अधिक फ्रेश दिसतो.