Sameer Amunekar
कोरड्या त्वचेसाठी चेहरा स्वच्छ करताना सौम्य आणि मॉइश्चरायझिंग फेसवॉश वापरा. खूप गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा टिकवण्यास मदत होते.
चेहरा स्वच्छ केल्यानंतर अल्कोहोल नसलेला हायड्रेटिंग टोनर वापरा. यामुळे त्वचेला ताजेतवाने वाटते. ग्लिसरीन किंवा हायलुरॉनिक ॲसिड असलेले टोनर निवडू शकता.
कोरड्या त्वचेसाठी मॉइश्चरायझर अत्यंत महत्त्वाचे आहे. सेरामाइड्स, ग्लिसरीन किंवा हायलुरॉनिक ॲसिड असलेले मॉइश्चरायझर निवडा. चेहरा किंचित ओलसर असतानाच ते लावल्यास ओलावा टिकण्यास मदत होते.
सकाळच्या स्किनकेअर रुटीनमधील सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे सनस्क्रीन. SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त आणि ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरा. यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते.
रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील मेकअप, धूळ आणि सनस्क्रीन व्यवस्थित काढा. यासाठी सौम्य क्लिन्झर वापरा. चेहरा स्वच्छ करताना त्वचा जास्त घासणे टाळा.
रात्री चेहरा स्वच्छ केल्यानंतर सेरामाइड्स, स्क्वालेन किंवा ग्लिसरीन असलेले नाईट क्रीम लावा. यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यास आणि त्वचेतील ओलावा टिकवण्यास मदत होते.
कोरड्या त्वचेसोबतच ओठ आणि डोळ्यांभोवतीची त्वचाही कोरडी पडू शकते. त्यामुळे ओठांना लिप बाम आणि डोळ्यांभोवती योग्य मॉइश्चरायझर लावा. दिवसभर पुरेसे पाणी पिण्याची सवयही ठेवा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.