Sameer Amunekar
पावसाळ्यात आर्द्रता वाढल्याने त्वचा तेलकट, निस्तेज आणि मुरुमांची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे नैसर्गिक घटकांपासून बनवलेली फेस क्रीम फायदेशीर ठरते.
2 चमचे अॅलोवेरा जेल, 1 चमचा गुलाबपाणी, 1 चमचा बदाम तेल आणि 1 व्हिटॅमिन E कॅप्सूल.
एका स्वच्छ बाऊलमध्ये अॅलोवेरा जेल घ्या. त्यात गुलाबपाणी, बदाम तेल आणि व्हिटॅमिन E चे तेल मिसळून चांगले मिक्स करा.
मिश्रण हलके, मऊ आणि क्रीमी झाल्यावर ते स्वच्छ डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवा.
रात्री चेहरा स्वच्छ धुवून ही क्रीम हलक्या हाताने चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. सकाळी ताजेतवाने त्वचा दिसेल.
अॅलोवेरा त्वचेला हायड्रेट ठेवते, गुलाबपाणी ताजेपणा देते, तर बदाम तेल त्वचेला नैसर्गिक चमक मिळवून देते.
कोणत्याही नैसर्गिक उपायाचा वापर करण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. त्वचेची अॅलर्जी किंवा संवेदनशीलता असल्यास तज्ज्ञांचा सल्ला