Sameer Amunekar
अतिरिक्त आर्द्रता, घाम आणि टाळूवरील बुरशीजन्य संसर्गामुळे पावसाळ्यात डोक्याची खाज वाढू शकते.
नियमित केस धुतल्याने टाळूवरील घाण, तेलकटपणा आणि कोंडा कमी होण्यास मदत होते.
खोबरेल तेल टाळूला नैसर्गिक ओलावा देते आणि खाज कमी करण्यास मदत करते.
नीम तेलामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असल्याने टाळूच्या समस्यांवर आराम मिळू शकतो.
खोबरेल तेलात काही थेंब नीम तेल मिसळून टाळूला मसाज केल्यास खाज आणि कोंड्यावर नियंत्रण मिळवता येते.
रात्री झोपण्यापूर्वी तेल लावून हलका मसाज करा आणि सकाळी सौम्य शॅम्पूने केस धुवा.
घरगुती उपाय करूनही खाज कमी होत नसेल तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.