Akshata Chhatre
केवळ २५ व्या वर्षी, सितारवादक ऋषभ ऋखीराम शर्मा यांनी संगीत आणि आध्यात्मिकतेचा सुंदर संगम साधला आहे.
त्यांनी आपल्या दातांमध्ये प्रत्येकी ५ सेंट वजनाचे ६ हिरे बसवले आहेत, फॅशनसाठी नव्हे, तर आध्यात्मिक ऊर्जेसाठी.
ऋषभ यांच्या लूकमध्ये ‘शृंगार’ शैलीचं दर्शन घडतं. सौंदर्य आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक विशेष करून पाहायला मिळते.
सितार फॉर मेंटल हेल्थ या उपक्रमातून त्यांनी संगीत थेरपीचा उपयोग मानसिक आरोग्यासाठी करायला सुरुवात केली आहे.
हिरे जडवण्यामागचा उद्देश संगीत सादरीकरणात सकारात्मकता आणणं आणि आत्मविश्वास वाढवणं असं असल्याचं ऋषभ म्हणलेत.
ऋषभ यांनी पारंपरिक संगीताला आधुनिकतेचा स्पर्श दिलाय त्यांच्याकडे संगीत, साधना आणि सौंदर्याचं अद्वितीय मिश्रण पाहायला मिळतं.