Akshata Chhatre
चालताना पायातील स्नायूत गोळा येऊन वेदना होणे ही एक त्रासदायक तक्रार आहे. असा गोळा आल्यावर थांबण्याला पर्याय नसतो.
एखाददुसऱ्या मिनिटाच्या विश्रांतीने परत चालता किंवा पूर्वी करीत असणारे काम करता येते. हा आजार साधारण साठीच्या वयात अधिक आढळतो.
ज्या व्यक्तींना मधुमेह, रक्तदाब वाढलेला असणे, रक्तातील मेदघटकांचे प्रमाण योग्य नसणे, तंबाखूचे कोणत्याही प्रकारे सेवन करणे, असे दोष असतात त्या पुरुषांत हा आजार अधिक प्रमाणात आढळतो.
विकार वाढला तर बसल्या बसल्यादेखील तो अवयव दुखू लागतो. अवयवाला रक्ताचा पुरवठा कमी होण्याने असा त्रास होतो.
महारोहिणीत रक्तप्रवाहात अडथळा येऊ लागला तर पार्श्वभागात, खुब्यात, मांडीत, पिंढऱ्यांत पेटके येऊ लागतात. पायातील रक्तवाहिन्यांचे स्पंदन मंदावते, पाय पांढरे पडू लागतात
पायातील शक्ती झपाट्याने कमी होते. पाय गार पडतात. या प्रकारच्या विकारांचे निदान लवकरात लवकर करणे इष्ट असते.