गोमन्तक डिजिटल टीम
गोव्याचे विविधरंगी किनारे लोकांना खुणावत असतात त्यामुळे तिथे सतत पर्यटकांची गर्दी दिसते.
पण गोव्यात काही किनारे असे आहेत जिथे पोचताच तुम्ही शांतता अनुभवू शकता. अशाच एका खास किनाऱ्याची माहिती देत आहोत.
अत्यंत शांत आणि सुखद वातावरणाचा अनुभव देणारा हा शिरदोणा किनारा म्हणजे गोव्याचे एक रत्न आहे.
हा किनारा जितका शांततेसाठी प्रसिद्ध आहे तसाच हा इथे वाळूत असणाऱ्या शंखशिंपल्यांसाठी प्रसिद्ध आहे.
दगडांच्या खास रचनेमुळे हा किनारा त्याचे वेगळेपण जपून आहे. समुद्रात असणारा मोठा दगड पर्यटकांना आकर्षित करतो.
इतक्या सगळ्या वैशिष्टयांनी हा किनारा सजलेला असल्यामुळे इथला सूर्यास्त आणखीनच खास दिसतो.
शिरदोणा गावाचा, किनाऱ्याचा फेरफटका मारणे आणि या आल्हाददायक वातावरणात स्थानिक जेवणाचा आनंद घेण्याने तुमचा दिवस उत्तम जाईल.
हे ठिकाण पणजीपासून १० किमी, मडगावपासून २७ किमी आणि दाबोळी विमानतळापासून २५ किमी आहे.
पणजीपासून जवळच आहे 'हे' ठिकाण! तुम्ही इथे गेला आहात का?