पणजीपासून जवळच आहे 'हे' ठिकाण! तुम्ही इथे गेला आहात का?

गोमन्तक डिजिटल टीम

राजधानी पणजी

गोव्याचे हृदय असलेली राजधानी पणजी तुम्ही पाहिली असेल. तिथून जवळच असलेले हे सुंदर ठिकाण आपण पाहिले आहे का?

Panjim

रायबंदर

निसर्गाच्या वरदहस्ताने आणि गोवन संस्कृतीने नटलेले रायबंदर हे ठिकाण पाहणे हा एक नयनरम्य अनुभव आहे.

Raibandar

मांडवीचे विहंगम दृश्य

रायबंदरच्या सुंदरतेला मांडवी नदीचे पात्र आणखीनच खुलवते. या ठिकाणाहून दिसणारे सूर्यास्ताचे दृश्य अद्भुत असते.

Raibandar

अवर लेडी ऑफ हेल्प चर्च

मांडवी नदीच्या काठावर बांधलेली ही टुमदार वास्तू रायबंदरच्या अनेक घटनांची साक्षीदार आहे.

Our Lady Of Help Church

राममंदिर

रायबंदरचे हे गोवन पद्धतीचे राम मंदिर खूप शांत ठिकाण आहे. इथे वार्षिक उत्सवावेळी विविध कार्यक्रम सादर होत असतात.

Ram Mandir Raibandar

पारंपारिक मिठागरे

या परिसरात तुम्हाला अनेक मिठागरे पाहायला मिळतील जिथे पारंपारिक पद्धतीने मीठ बनवण्याची प्रक्रिया पाहता येते.

Raibandar

गोवन पद्धतीची घरे

गोवन पद्धतीची घरे, त्यांची वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगती खासच असते. रायबंदरमध्ये फिरताना हा आनंद तुम्हाला घेता येईल.

Raibandar

वैशिष्ट्यपूर्ण गल्ल्या

रायबंदरमध्ये छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये फिरणे ही एक वेगळीच मजा आहे. जुनी घरे आणि त्यांच्या रचना पाहण्यासारख्या आहेत.

Raibandar

सुंदर बेटे

चोराव आणि दिवाडी ही दोन सुंदर बेटे रायबंदरपासून जवळच आहेत. तुम्ही इथेही पर्यटनाचा आनंद घेऊ शकता.

Islands

गोव्यातील बीचेस, किल्ले पाहून झाले? मग आता या 'वेगळ्या जगाची' सफर नक्कीच करा..

Mangrove
आणखी पाहा