Manish Jadhav
सिंहगड हा किल्ला 'कोंढाणा' या नावाने ओळखला जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमामुळे आणि बलिदानामुळे या किल्ल्याचे नाव बदलून 'सिंहगड' असे ठेवले.
भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, सिंहगड किल्ला ज्या डोंगररांगेवर आहे, ती डोंगररांग सुमारे 5 कोटी वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झाली आहे. येथील काळा पाषाण याची साक्ष देतो.
लोकमान्य टिळकांचा आवडते ठिकाण
लोकमान्य टिळक उन्हाळ्यात हवा पालटण्यासाठी सिंहगडावर जात असत. किल्ल्यावर त्यांचा एक बंगला आजही अस्तित्वात आहे. याच ठिकाणी टिळक आणि महात्मा गांधी यांची ऐतिहासिक भेट झाली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांचे निधन सिंहगडावर झाले होते. किल्ल्यावर त्यांची सुंदर समाधी आजही पाहायला मिळते, जी शिवप्रेमींचे श्रद्धास्थान आहे.
तानाजी मालुसरे यांनी ज्या 'दोनगिरी' कड्यावरुन घोरपडीच्या साहाय्याने चढाई केली होती, तो कडा आजही पाहून अंगावर काटा येतो. शत्रूला कल्पनाही नव्हती अशा उभ्या कड्यावरुन मावळ्यांनी हा किल्ला सर केला होता.
किल्ल्यावर 'हत्ती टाके' नावाचे पाण्याचे मोठे कुंड आहे. असे म्हणतात की पूर्वी येथे हत्तींना पाणी पाजले जात असे. येथील पाणी नैसर्गिक गाळणीतून येत असल्याने ते अतिशय शुद्ध आणि थंड असते.
किल्ल्यावरील 'देवटाके' हे पाण्याचे कुंड कधीही आटत नाही. उन्हाळ्यातही या टाक्यात भरपूर आणि थंडगार पाणी असते, जे गडावर येणाऱ्या हजारो पर्यटकांची तहान भागवते.
सिंहगडावर अतिशय प्राचीन असे 'अमृतेश्वर' मंदिर आहे. हे मंदिर यादवकालीन स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना मानले जाते. गडाचे रक्षण करणारी देवता म्हणून या मंदिराला महत्त्व आहे.