Manish Jadhav
चंद्रपूर किल्ला हा गोंड राजांच्या वास्तुकलेचा आणि पराक्रमाचा एक उत्तम नमुना आहे.
या किल्ल्याचे बांधकाम गोंड राजा खांडक्या बल्लाळशहा यांनी 15व्या शतकात सुरु केले होते आणि नंतरच्या काळात ते पूर्ण झाले.
या किल्ल्याची तटबंदी तब्बल 15 ते 20 फूट उंच आणि प्रचंड रुंद आहे. विशेष म्हणजे ही तटबंदी संपूर्ण शहराला वेढलेली आहे, जे भारतात खूप कमी ठिकाणी पाहायला मिळते.
किल्ल्याला चार मुख्य प्रवेशद्वारे आहेत, ज्यांची नावे जटपुरा, विठ्ठल, बिनबा आणि बाणवा अशी आहेत. हे दरवाजे आजही शहराच्या मध्यभागी दिमाखात उभे आहेत.
हा किल्ला इरई आणि झरपट या दोन नद्यांच्या संगमावर वसलेला आहे. यामुळे किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण आणि सौंदर्याची जोड मिळाली आहे.
चार मुख्य दरवाज्यांव्यतिरिक्त, किल्ल्याला पाच लहान उप-द्वारे किंवा खिडक्या आहेत. त्यांना चोरखिडकी, विठ्ठल खिडकी, बाणवा खिडकी, जटपुरा खिडकी आणि हनुमान खिडकी म्हणून ओळखले जाते.
किल्ल्याच्या भिंतींवर हत्ती, सिंह आणि पौराणिक प्राण्यांची सुंदर चित्रे कोरलेली आढळतात. गोंडकालीन वास्तुशैलीचे हे उत्तम उदाहरण मानले जाते.
बहुतेक किल्ले शहराबाहेर किंवा डोंगरावर असतात, मात्र चंद्रपूरचा किल्ला हा अशा काही मोजक्या किल्ल्यांपैकी एक आहे ज्याच्या तटबंदीच्या आत आजही मुख्य शहराचा भाग वसलेला आहे.
चंद्रपूरला भेट देणाऱ्या पर्यटकांना या किल्ल्याची भव्यता भुरळ घालते. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या जवळ असल्याने, वन्यजीव पर्यटनासोबतच ऐतिहासिक पर्यटन म्हणूनही या किल्ल्याचे महत्त्व मोठे आहे.