Sameer Panditrao
भारत देश शिक्षण क्षेत्रात पुढे जात आहे पण शिक्षकांबद्दल एक वेगळीच आकडेवारी समोर आली आहे.
देशभरातील एक लाखाहून अधिक शाळांमध्ये एकच शिक्षक असून, अशा शाळांमध्ये ३३ लाखांहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत.
आंध्र प्रदेशात अशा शाळांची संख्या सर्वात जास्त आहे,
त्यानंतर उत्तर प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र, कर्नाटक आणि लक्षद्वीप यांचा क्रमांक लागतो.
मात्र, एकल शिक्षकाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येच्या बाबतीत उत्तर प्रदेश अव्वल स्थानावर आहे.
त्यानंतर झारखंड, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश यांचा क्रमांक लागतो.
एकल शिक्षकाच्या शाळांची संख्या २०२२-२३ मधील १,१८,१९० वरून २०२३-२४ मध्ये १,१०,९७१ पर्यंत खाली आली आहे. ही घट सहा टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येते.