Sameer Amunekar
बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या आवाजाची जादू दाखवणारा प्रसिध्द गायक दर्शन रावल लग्नबंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दर्शननं त्याची गर्लफ्रेंड धरल सुरेलियासोबच लग्न केलंय. हे दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.
दर्शननं सोशल मीडियावर त्याच्या लग्नाबद्दलची बातमी शेअर केली आहे. आता त्याच्या पोस्टवर त्याचे चाहते कमेंट्स करून अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये हे नवविवाहित जोडपं खूप सुंदर दिसत आहे.
धरल सुरेलियानं सुंदर पोशाख परिधान केला होता. लाल रंगाच्या लेहेंग्यामध्ये धरल खूप सुंदर दिसत आहे.
दर्शन रावलनं आयवरी रंगाच्या चिकनकारी शेरवानी परिधान केली आहे. एका फोटोमध्ये, दर्शन मंडपात त्याची वधू धरलच्या हाताला किस देताना दिसत आहे.