Sameer Amunekar
अमेरिकेचे सैन्य हे जगातील सर्वात शक्तिशाली मानले जाते. त्यांच्या लष्करात सुमारे १३ लाख सैनिक आहेत. त्यांच्या ताफ्यात १३,२४७ लढाऊ विमाने, ४५,१९३ लष्करी वाहने, ६,६१२ रणगाडे, ४८४ युद्धनौका, ११ विमानवाहू जहाजे आणि ६८ पाणबुड्या समाविष्ट आहेत.
रशियाचे सैन्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्या लष्करात सुमारे ८.५ लाख सैनिक आहेत. त्यांच्या ताफ्यात ४,१७३ युद्धक विमाने, ३०,१२२ लष्करी वाहने, १२,४२० रणगाडे, ६०५ युद्धक जहाजे आणि ७० पाणबुड्या समाविष्ट आहेत.
चीनचे सैन्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्या लष्करात सुमारे २० लाख सैनिक आहेत, जी जगातील सर्वाधिक संख्या आहे. चीनचे वार्षिक संरक्षण बजेट सुमारे २५० अब्ज डॉलर आहे. त्यांच्या ताफ्यात ३,२८५ युद्ध विमाने, ३५,००० लष्करी वाहने, ५,२५० रणगाडे, ७७७ युद्ध जहाजे आणि ७९ पाणबुड्या समाविष्ट आहेत.
भारतीय सैन्य चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांच्या लष्करात सुमारे १४ लाख सैनिक आहेत. भारताचे वार्षिक संरक्षण बजेट सुमारे ४९.६ अब्ज डॉलर आहे. त्यांच्या ताफ्यात २,१८२ युद्ध विमाने, १२,००० लष्करी वाहने, ४,६१४ रणगाडे, १५० युद्धक जहाजे, २ विमानवाहू जहाजे आणि १८ पाणबुड्या समाविष्ट आहेत.
जपानचे सैन्य पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांच्या लष्करात सुमारे २.४ लाख सैनिक आहेत. जपानचे वार्षिक संरक्षण बजेट सुमारे ४७ अब्ज डॉलर आहे. त्यांच्या ताफ्यात १,४४९ युद्धक विमाने, ५,५०० लष्करी वाहने, १,००७ रणगाडे, १५५ युद्ध जहाजे आणि २१ पाणबुड्या समाविष्ट आहेत.
जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य दलाच्या यादितून पाकिस्तानचं लष्कर टॉप-१० मध्येही नाहीय. पाकिस्तानचं लष्कर या यादित १२व्या क्रमांकावर आहे.