Sindhudurg Fort: समुद्राच्या मधोमध गोड पाणी अन् शिवरायांचे एकमेव मंदिर; किल्ले सिंधुदुर्गचे 'हे' 7 चमत्कार माहितीयेत का?

Sameer Amunekar

अथांग समुद्रातील अभेद्य जलदुर्ग

सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्राच्या मालवण किनाऱ्याजवळ अरबी समुद्रातील 'कुरटे' बेटावर ४८ एकर क्षेत्रात पसरलेला एक भव्य जलदुर्ग आहे. १६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणांना पायबंद घालण्यासाठी या किल्ल्याची पायाभरणी केली.

Sindhudurg Fort | Dainik Gomantak

भक्कम पाया आणि शिशाचा वापर

समुद्राच्या अक्राळविक्राळ लाटांचा मारा झेलण्यासाठी या किल्ल्याची तटबंदी अत्यंत मजबूत करण्यात आली. किल्ल्याचा पाया रचताना त्यात कित्येक खंडी 'शिशाचा' (Lead) वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे आजही हा किल्ला समुद्रात दिमाखात उभा आहे.

Sindhudurg Fort | Dainik Gomantak

लपवलेले 'गोमुखी' प्रवेशद्वार

या किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार (महाद्वार) अशा प्रकारे डिझाइन केले आहे की ते बाहेरून सहजासहजी नजरेस पडत नाही. या 'गोमुखी' रचनेमुळे शत्रूला दरवाजा नेमका कुठे आहे हे कळत नसे आणि थेट तोफांचा मारा करणेही अशक्य होत असे.

Sindhudurg Fort | Dainik Gomantak

शिवरायांचे एकमेव मंदिर आणि मूर्ती

किल्ल्याच्या आत छत्रपती राजाराम महाराज यांनी १६९५ मध्ये बांधलेले शिवरायांचे एक भव्य मंदिर आहे. येथे महाराज 'वीरासनात' बसलेले असून, हे जगातील असे एकमेव मंदिर आहे जेथे शिवरायांची 'देवरूपात' पूजा केली जाते.

Sindhudurg Fort | Dainik Gomantak

महाराजांच्या हस्त-पाऊलखुणा

किल्ल्याच्या तटबंदीवर एका जागी छत्रपती शिवाजी महाराजांच्या उजव्या हाताचा आणि डाव्या पायाचा ठसा एका शिळेवर उमटलेला पाहायला मिळतो. शिवप्रेमींसाठी हे ठिकाण अत्यंत पवित्र आणि आकर्षणाचे केंद्र आहे.

Sindhudurg Fort | Dainik Gomantak

समुद्राच्या मधोमध गोड्या पाण्याचे झरे!

चारही बाजूंनी खारे पाणी असूनही किल्ल्याच्या आत तीन ऐतिहासिक विहिरी आहेत, ज्यांचे पाणी अत्यंत गोड आहे. यांना 'दूध विहीर', 'दही विहीर' आणि 'साखर विहीर' म्हणून ओळखले जाते, ज्या सैनिकांच्या पाण्याची गरज भागवत असत.

Sindhudurg Fort | Dainik Gomantak

युनेस्को (UNESCO) जागतिक वारसा मानांकन

मराठा साम्राज्याच्या अद्वितीय युद्धकलेचे आणि वास्तुकलेचे प्रतीक असलेला हा किल्ला 'राष्ट्रीय संरक्षित स्मारक' तर आहेच, शिवाय याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या (UNESCO World Heritage Site) नामांकनातही मानाचे स्थान मिळाले आहे.

Sindhudurg Fort | Dainik Gomantak

नैसर्गिक ग्लो मिळवण्यासाठी आजपासूनच फॉलो करा 'या' 7 सोप्या टिप्स

Glowing Skin | Dainik Gomantak
येथे क्लिक करा