Glowing Skin: काचेसारखी चमकेल त्वचा! नैसर्गिक ग्लो मिळवण्यासाठी आजपासूनच फॉलो करा 'या' 7 सोप्या टिप्स

Sameer Amunekar

पुरेसे पाणी प्या

शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी आणि त्वचेला आतून हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसातून किमान ८ ते १० ग्लास पाणी नक्की प्या.

Glowing Skin | Dainik Gomantak

दररोज 'सीटीएम' (CTM) फॉलो करा

ग्लोइंग त्वचेसाठी क्लींझिंग (Cleansing), टोनिंग (Toning) आणि मॉइश्चरायझिंग (Moisturizing) ही त्रिसूत्री कधीही विसरू नका. यामुळे त्वचा स्वच्छ आणि मऊ राहते.

Glowing Skin | Dainik Gomantak

सनस्क्रीनचा नियमित वापर

उन्हात जाताना किंवा घरात असतानाही नियमितपणे SPF युक्त सनस्क्रीन लावा. यामुळे सूर्याच्या अतिनील (UV) किरणांपासून त्वचेचे रक्षण होते आणि काळे डाग पडत नाहीत.

Glowing Skin | Dainik Gomantak

आठवड्यातून एकदा एक्सफोलिएशन

त्वचेवरील मृत पेशी (Dead Skin Cells) काढून टाकण्यासाठी आठवड्यातून १-२ वेळा हलक्या हाताने स्क्रब करा. यामुळे त्वचेचा नैसर्गिक पोत सुधारतो.

Glowing Skin | Dainik Gomantak

घरगुती फेस पॅकचा वापर

केमिकल ऐवजी हळद-बेसन, कोरफड (Aloe Vera) किंवा मध-दही यांचे मिश्रण चेहऱ्याला लावा. हे नैसर्गिक घटक त्वचेला तजेलदार बनवतात.

Glowing Skin | Dainik Gomantak

८ तासांची गाढ झोप

अपुऱ्या झोपेमुळे चेहऱ्यावर थकवा आणि डार्क सर्कल्स दिसू लागतात. त्वचा स्वतःला रात्री रिपेअर करते, त्यामुळे ७ ते ८ तासांची शांत झोप खूप महत्त्वाची आहे.

Glowing Skin | Dainik Gomantak

सकस आहार आणि व्यायाम

आहारात ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या आणि सुक्या मेव्याचा समावेश करा. तसेच रोज १५-२० मिनिटे व्यायाम किंवा योगासने केल्याने रक्ताभिसरण सुधारून चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.

Glowing Skin | Dainik Gomantak

रोज नेमाने 'हे' करा, चेहऱ्यावर येईल असा ग्लो की पार्लर विसरून जाल

Glowing Skin | Dainik Gomantak
येथे क्लिक करा