Sameer Amunekar
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी इ.स. 1664 मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी केली व 1667 पर्यंत त्याचे बांधकाम पूर्ण केले.
किल्ल्यावर तीन प्रमुख प्रवेशद्वारे आहेत – पूर्वेला दिल्ली दरवाजा, पश्चिमेला नारायण दरवाजा आणि उत्तरेला गोमुख दरवाजा.
एकूण 52 बुरुज असून त्यात नंदी बुरुज, भैरव बुरुज, चंडी बुरुज आणि राम बुरुज विशेष प्रसिद्ध आहेत.
किल्ल्यावर राजवाडा, अंधारबाव, गुप्त मार्ग, कालिका देवी मंदिर आणि सूर्य मंदिर या ऐतिहासिक व धार्मिक वास्तू आहेत.
उत्तरेला असलेला हा मार्ग शत्रूच्या हल्ल्यावेळी गुप्तरीत्या बाहेर पडण्यासाठी वापरला जात असे.
किल्ल्यावरून अथांग निळाशार समुद्र, किनाऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि मालवणचे रमणीय दृश्य दिसते.
48 एकरात पसरलेला हा किल्ला काही तासांत पाहता येतो; परंतु त्याचे ऐतिहासिक वैभव, समुद्राचे रूप आणि मनोहर परिसर पर्यटकांना अविस्मरणीय अनुभव देतात.