Sameer Panditrao
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीजवळ एक सुंदर ठिकाण पाहता येते.
हिरण्यकेशी म्हणजे आंबोलीजवळ उगम पावणारी एक नदी आणि तेथील एक प्राचीन धार्मिक स्थळ आहे, जिथे मंदिर आहे.
या नदीला पौराणिक महत्त्व असून ती घटप्रभा नदीला मिळते.
तिच्या उगमाच्या ठिकाणी धबधबा व विविध गुहा आहेत.
बांधकाम केल्याने या नदीच्या उगमातून येणाऱ्या पाण्यात उतरून अंघोळीचा आनंद घेता येतो.
हा पूर्ण परिसर निसर्गसंपन्न आहे.
आंबोलीपासून हे ठिकाण १५ मिनिटांच्या अंतरावरती आहे.