Sameer Panditrao
गोवा म्हणजे समुद्रकिनारे, शांत वातावरण आणि एक अद्वितीय पर्यटन अनुभव आहे.
गोव्याच्या या प्रतिमेला बिहारकडून टक्कर दिली जात आहे.
मुजफ्फरपूरजवळील ‘खरौना कॅनॉल’ हे ठिकाण सध्या ‘बिहारचे गोवा’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
बिहारचा विकसित होत असलेला हा परिसर वातावरण, झाडांची सावली आणि जलधारा यामुळे पर्यटकांचे आकर्षण बनत चालला आहे.
तुलनेने इथला खर्च कमी आहे.
बिहार सरकारने आपल्या संकेतस्थळावर ‘बिहारमधील गोवा’ अशी या भागाची जोरदार जाहिरातबाजी चालवली आहे.
खरौना कॅनॉल हे अगदी गोव्यासारखे अनुभव देणारे स्थान बनत आहे.