Relationship Tips: रुसलेल्या बायकोला कसं मनवावं? टेन्शन सोडून आजच नोट करून ठेवा 'हा' 7 कलमी सोपा फॉर्म्युला!

दैनिक गोमन्तक डिजिटल

शांतपणे तिचं म्हणणं ऐकून घ्या

सर्वात आधी ती का रुसली आहे, हे शांतपणे ऐकून घ्या. मध्येच तोडल्याने राग वाढू शकतो. तिचं म्हणणं पूर्ण ऐकल्याने तिला वाटेल की तुम्ही तिची बाजू समजून घेत आहात.

Relationship Tips | Dainik Gomantak

तुमची चूक मान्य करायला लाजू नका

जर तुमची चूक असेल, तर ती प्रामाणिकपणे मान्य करा. 'सॉरी' म्हणताना त्यात अहंकार नसावा. साधे एक 'सॉरी' मनातील अनेक गाठी सोडवू शकते.

Relationship Tips | Dainik Gomantak

प्रेमाने संवाद साधा

राग व्यक्त करताना आवाजाची पट्टी वाढवू नका. शांत आणि प्रेमाने संवाद साधल्यास वादाचे रूपांतर संवादात होईल. रागाच्या भरात टोमणे मारणे टाळा.

Relationship Tips | Dainik Gomantak

तिची आवडती गोष्ट किंवा सरप्राईज

तिचे आवडते चॉकलेट, फूल किंवा एखादा छोटासा गिफ्ट देऊन तिचे मूड बदलण्याचा प्रयत्न करा. कधीकधी लहानशा सरप्राईजमुळे राग लवकर गळून पडतो.

Relationship Tips | Dainik Gomantak

सोबत दर्जेदार वेळ घालवा

मोबाईल बाजूला ठेवा आणि पूर्ण वेळ तिला द्या. एखादा छोटा वॉक किंवा एकत्र कॉफी पिल्याने एकमेकांशी मोकळेपणाने बोलता येते.

Relationship Tips | Dainik Gomantak

घरकामात मदत करा

कधीकधी कामाच्या व्यापातून तिला थकवा येतो आणि त्यातून चिडचिड होते. अशा वेळी घरकामात मदत करून तिला आराम द्या, यामुळे तिला तुमच्याबद्दल आपुलकी वाटेल.

Relationship Tips | Dainik Gomantak

'क्वालिटी' माफी आणि भावनिक आधार

फक्त 'सॉरी' न म्हणता, तिची मनस्थिती समजून घ्या. तिला सांगा की, "तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस." तुमचा हा भावनिक पाठिंबा तिचा राग नक्कीच शांत करेल.

Relationship Tips | Dainik Gomantak

बोलताना 'या' 8 गोष्टींवर ठेवा बारीक लक्ष, गुपित येईल समोर

Mind Reading | Dainik Gomantak
येथे क्लिक करा