Sameer Amunekar
झोपेच्या वेळी त्वचा स्वतःची दुरुस्ती करते. योग्य सवयी अंगीकारल्यास सकाळी त्वचा अधिक तजेलदार दिसू शकते.
झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा आणि मेकअप किंवा सनस्क्रीन पूर्णपणे काढा. यामुळे छिद्रे स्वच्छ राहतात.
त्वचेच्या प्रकारानुसार हलके किंवा हायड्रेटिंग मॉइश्चरायझर वापरा. यामुळे रात्री त्वचेला आवश्यक ओलावा मिळतो.
वारंवार चेहऱ्याला स्पर्श केल्याने धूळ, तेल आणि जंतू त्वचेवर जाऊ शकतात. ही सवय कमी करा.
अस्वच्छ पिलो कव्हरवर धूळ आणि बॅक्टेरिया साचू शकतात. आठवड्यातून किमान एकदा कव्हर बदलण्याचा प्रयत्न करा.
रोज 7–8 तासांची झोप आणि दिवसभर पुरेसे पाणी पिणे त्वचेच्या नैसर्गिक चमकासाठी महत्त्वाचे ठरू शकते.
रात्रीची स्किनकेअर नियमित ठेवा. त्वचेत काही समस्या असल्यास किंवा नवीन उत्पादने वापरण्यापूर्वी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.