Sameer Amunekar
पहिली छाप खूप महत्त्वाची असते. एक स्मितहास्य आणि नम्र अभिवादन नवीन मैत्रीची सुरुवात सहज करू शकते.
फक्त बोलू नका, तर समोरच्याचं लक्षपूर्वक ऐका. चांगला श्रोता असणाऱ्या व्यक्तींशी लोक पटकन जोडले जातात.
चित्रपट, खेळ, प्रवास, संगीत किंवा पुस्तकं अशा समान आवडींवर संवाद सुरू केल्यास मैत्री लवकर घट्ट होते.
इतरांना प्रभावित करण्यासाठी खोटं व्यक्तिमत्त्व दाखवू नका. प्रामाणिकपणा आणि साधेपणा दीर्घकाळ टिकणाऱ्या मैत्रीचा पाया असतो.
गरज पडल्यास सहकार्य करा. छोटीशी मदतही विश्वास वाढवते आणि नातं अधिक मजबूत बनवते.
मैत्री फक्त एकदा भेटून होत नाही. अधूनमधून मेसेज, फोन किंवा भेट यामुळे नात्यातील जवळीक वाढते.
समोरच्याच्या मतांचा, भावना आणि वैयक्तिक मर्यादांचा आदर करा. विश्वास आणि परस्पर सन्मान हीच खरी मैत्री टिकवण्याची गुरुकिल्ली आहे.