Manish Jadhav
शानदार मायलेज कोणाला आवडत नाही, म्हणून आज (25 जून) आम्ही तुम्हाला या वेबस्टोरीच्या माध्यमातून अशा एसयूव्ही बाबत सांगणार आहोत, जी मायलेजच्या बाबतीत उत्कृष्ट आहे.
या एसयूव्हीचे नाव मारुती सुझुकी ग्रँड विटारा आहे, ही शक्तिशाली एसयूव्ही केवळ अफलातून फीचर्समुळेच नाहीतर दमदार मायलेजसाठीही ओळखली जाते.
क्रेटा आणि सेल्टोस सारख्या वाहनांना टक्कर देणारी ही एसयूव्ही ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
कंपनीच्या अधिकृत साईटवर दिलेल्या माहितीनुसार, मारुती सुझुकी ग्रँड विटारा या एसयूव्हीचे मायलेज वेगवेगळ्या व्हेरिएंटसाठी वेगळे आहे. या वाहनाच्या मजबूत हायब्रिड ई-सीव्हीटी व्हेरिएंटबाबत कंपनीचा दावा आहे की, हा व्हेरिएंट सर्वाधिक मायलेज देतो, या मॉडेलसह तुम्हाला एका लिटरमध्ये 27.97 किलोमीटरपर्यंत मायलेज मिळेल.
स्मार्ट हायब्रिड व्हेरिएंट 19.38 ते 21.11 किमी/किलोग्राम मायलेज देतात आणि सीएनजी व्हेरिएंट 26.6 किमी/किलोग्राम पर्यंत मायलेज देतात. या एसयूव्हीची किंमत 11.42 लाख रुपये (एक्स-शोरूम) ते 20.52 लाख रुपये (एक्स-शोरुम) पर्यंत आहे.
कारदेखोच्या मते, क्रेटाचा डिझेल (मॅन्युअल) व्हेरिएंट प्रति लिटर 21.8 किमी आणि ऑटोमॅटिक (डिझेल) प्रकार 19.1 किमी पर्यंत मायलेज देतो.
त्याचवेळी, या कारचा पेट्रोल (ऑटोमॅटिक) व्हेरिएंट प्रति लिटर 18.4 किमी आणि मॅन्युअल व्हेरिएंट 17.4 किमी पर्यंत अंतर कापू शकतो. या लोकप्रिय एसयूव्हीची किंमत 11,10,900 रुपये (एक्स-शोरुम) ते 20,49,800 रुपये (एक्स-शोरुम) पर्यंत आहे.