Akshata Chhatre
रात्री कितीही प्रयत्न केला तरी झोप येत नाही का? मग हे उपाय तुमच्यासाठी आहेत, यामुळे तुमची झोप उत्तम होईल आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ताजे तवाने असाल.
रोज एकाच वेळेस झोपायला जाणं आणि उठणं महत्वाचं आहे, यामुळे शरीराची नैसर्गिक सायकल सुधारते.
स्क्रीनमधील निळा प्रकाश मेंदू जागृत ठेवतो. झोपेच्या किमान 1 तास आधी मोबाईलपासून दूर रहा.
रात्री जड अन्न जेवल्याने झोप उशिरा येते. हलकं आणि लवकर जेवण झोपेसाठी उपयुक्त ठरतं.
चहा, कॉफी यांमध्ये असणाऱ्या कॅफिनमुळे झोप उशिरा लागते, त्यामुळे शक्यतो यांचा वावर टाळा.
झोपेच्या खोलीत जास्त प्रकाश असल्यास मेंदूला जागं राहायचा सिग्नल मिळतो. पूर्ण अंधारात झोप उत्तम लागते.