Akshata Chhatre
कधी कधी सगळं आपल्याविरुद्ध जातं, पण अशा वेळी देवच आपला खरा आधार असतो. मात्र, त्याची कृपा मिळवण्यासाठी नुसती श्रद्धा नाही, तर शुद्ध मन आणि कृतीही गरजेची आहे.
जर एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या दुःखाशी समरस होते आणि राग-द्वेषाशिवाय माफ करू शकते, तर हे देवाच्या कृपेचं लक्षण आहे.
ज्या व्यक्तीला देवाची कृपा मिळते, ती इतरांच्या सद्गुणांकडे पाहते, दोषांवर टिकत नाही. सकारात्मक दृष्टिकोन हे आत्मिक प्रगतीचं लक्षण आहे.
शरीराची आणि विचारांची स्वच्छता असलेली व्यक्ती जी आंतरिक पवित्रतेला महत्त्व देते तिच्यावर देव प्रसन्न होतो.
ज्यांचं मन भजन, प्रार्थना आणि साधनेत रमलेलं असतं, त्यांना समाज, पैसा किंवा वेळ यांचा अडथळा होत नाही. भक्तीत सातत्य असणं हेही कृपेचं चिन्ह आहे.
निस्वार्थीपणा हे भक्तीचं मूळ आहे. देव कृपेने प्रेरित व्यक्ती इतरांच्या मदतीत आनंद मानते.