दैनिक गोमन्तक डिजिटल
घटना घडण्यापूर्वीच त्याचे वाईट परिणाम मनात रंगवणे हे ओव्हरथिंकिंगचे मोठे लक्षण आहे.
समोरच्याने रिप्लाय उशिरा दिला की मनात शेकडो नकारात्मक शक्यता तयार होतात.
लहान चुकांनाही मोठे अपयश समजून स्वतःलाच दोष देत राहता.
चांगली गोष्ट घडली तरी "पुढे काहीतरी वाईट होणार" अशी भीती सतावत राहते.
प्रत्यक्षात न घडलेल्या संभाषणांचे किंवा भांडणांचे प्रसंग मनात वारंवार खेळवले जातात.
सामान्य अडचणींचेही मनात प्रचंड मोठे चित्र तयार होते.
मोकळा वेळ मिळाला की मेंदू आपोआप नकारात्मक विचारांच्या जाळ्यात अडकतो.
दिवसभर काही विशेष काम नसतानाही मानसिक थकवा आणि ऊर्जा कमी झाल्यास ते ओव्हरथिंकिंगचे संकेत असू शकतात.