Sameer Amunekar
जबरदस्तीने लग्न झालेल्यांना त्यांच्या लग्नाबाबत विशेष उत्साह नसतो. कपडे, फोटोशूट, प्लॅनिंग या गोष्टींबद्दल ते उदासीन असतात आणि चर्चा टाळतात.
लग्न जमत असतानाही त्यांचे चेहरे आनंदी न वाटणे, सतत चिंता, चिडचिड किंवा मूड बदल यासारखी मानसिक स्थिती दिसून येते.
ते लग्न का करत आहेत, हे विचारल्यावर थेट आणि स्पष्ट उत्तर न देता, "घरच्यांचा आग्रह होता", "आई-बाबांचा निर्णय आहे" अशी उत्तरं देतात.
त्यांना होणाऱ्या जोडीदाराबद्दल प्रेम, स्नेह किंवा आपुलकी कमी दिसते. संवादही औपचारिक किंवा मर्यादित असतो.
"माझं काही नाही, आईबाबांनी ठरवलं", "मी नाही म्हणू शकलो/शकलेच नाही" असं ते वारंवार सांगतात – म्हणजेच स्वतःचा निर्णय घेतलेला नसतो.
खूप जवळच्या मित्रांनाही ते लग्नाच्या तयारीबाबत उशिरा सांगतात किंवा पूर्ण सत्य लपवतात, कारण त्यांना मनापासून आनंद नसतो.