Sameer Amunekar
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे पश्चिम घाटात वसलेले एक निसर्गरम्य ठिकाण.
धुके, धबधबे, घनदाट जंगलं आणि थंड हवामान यामुळे पर्यटकांसाठी हे स्वर्गासमान आहे.
आंबोलीत एक पवित्र आणि ऐतिहासिक मंदिर आहे ते म्हणजे हिरण्यकेशी मंदिर.
हिरण्यकेशी मंदिर हे मंदिर केवळ धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचं नाही, तर भौगोलिक आणि पर्यटनदृष्ट्याही अत्यंत खास आहे.
शांत, साधं आणि निसर्गाच्या सानिध्यात हे मंदिर आहे.
मंदिराचा परिसर अत्यंत शांत, थंड आणि हिरवळीत न्हालेला आहे.