Manish Jadhav
जेवल्यानंतर लगेच झोपणे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरु शकते.
जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे शरीरातील पचनक्रिया मंदावते. अन्नाचे नीट पचन न झाल्यामुळे पोट फुगणे किंवा जड होण्यासारख्या समस्या निर्माण होतात.
जेवल्यानंतर लगेच झोपल्याने जठरातील पाचक रस अन्ननलिकेत परत येतात. यामुळे छातीत जळजळ होणे, घशात आंबट पाणी येणे आणि ॲसिडिटीचा त्रास वाढतो.
जेवल्यानंतर शरीर कॅलरीज जाळणे अपेक्षित असते, परंतु लगेच झोपल्यामुळे शरीराची हालचाल थांबते. यामुळे अन्नातील अतिरिक्त ऊर्जेचे रुपांतर फॅटमध्ये होते आणि वजन झपाट्याने वाढते.
तसेच, जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक असते.
भरलेले पोट घेऊन झोपल्यामुळे अस्वस्थता जाणवते. यामुळे झोप लागत नाही, परिणामी सकाळी उठल्यावर थकवा आणि सुस्ती जाणवते.
सतत जेवल्यानंतर लगेच झोपण्याच्या सवयीमुळे शरीराची चयापचय क्रिया (Metabolism) बिघडते, ज्यामुळे भविष्यात अनेक जुनाट आजार जडू शकतात.
काही अभ्यासांनुसार, जेवण आणि झोप यामध्ये पुरेसे अंतर नसल्यास हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याचा धोका वाढू शकतो.
या सवयीमुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि पोटाच्या इतर समस्या कायमस्वरुपी उद्भवू शकतात.