Manish Jadhav
ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे, त्यांना पनीर पचायला जड जाते. अशा लोकांनी पनीर जास्त प्रमाणात खाल्ल्यास फुगलेले पोट (Bloating) आणि गॅसचा त्रास होऊ शकतो.
पनीरमध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते. उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांसाठी अतिरिक्त सोडियम रक्तदाब वाढवण्यास कारणीभूत ठरु शकते, जे हृदयासाठी घातक आहे.
ज्यांना लॅक्टोज इनटॉलरन्स आहे, अशा लोकांना पनीर खाल्ल्यानंतर जुलाब, उलट्या किंवा पोटदुखी यांसारख्या गंभीर समस्या जाणवू शकतात.
पनीर हे प्रथिनांचा (Protein) मोठा स्रोत आहे. मात्र, ज्यांच्या शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण जास्त आहे, त्यांनी पनीर खाणे टाळावे; अन्यथा सांधेदुखी आणि सूज वाढू शकते.
किडनीशी संबंधित समस्या असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पनीर खाऊ नये. त्यातील प्रथिने आणि खनिजे किडनीवर अधिक ताण निर्माण करु शकतात.
पनीरमध्ये सॅच्युरेटेड फॅट (Saturated Fat) जास्त असते. कोलेस्ट्रॉल वाढलेले असल्यास किंवा हृदयाशी संबंधित तक्रारी असल्यास पनीरचे अतिसेवन हृदयविकाराचा झटका वाढवू शकते.
जर तुम्ही कडक डाएटवर असाल, तर पनीरच्या अतिसेवनामुळे कॅलरीज वाढू शकतात. विशेषतः तळलेले किंवा मसाल्यातील पनीर वजन कमी करण्याऐवजी वाढवू शकते.
काही लोकांना दुग्धजन्य पदार्थांमुळे त्वचेवर पुरळ किंवा मुरुमे येण्याचा त्रास होतो. जर तुम्हाला वारंवार मुरुमे येत असतील, तर पनीरचा आहारात मर्यादित वापर करा.