Konkan Tourism: पांढऱ्या वाळूत खेळा अन् मनसोक्त डुंबा! कोकणातील 'हे' मिनी गोवा पर्यटकांचं आवडतं डेस्टिनेशन; मुंबईपासून हाकेच्या अंतरावर

Manish Jadhav

निसर्गवेड्यांसाठी नंदनवन

किहीम बीच त्याच्या पांढऱ्या शुभ्र वाळूसाठी आणि किनाऱ्यावरील नारळ-पोफळीच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. अलिबागपासून केवळ 12 किमी अंतरावर असलेले हे ठिकाण शांतता शोधणाऱ्या पर्यटकांचे आवडते स्पॉट आहे.

Kihim Beach | Dainik Gomantak

फुलपाखरांचे नंदनवन

या किनाऱ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे आढळणारी रंगीबेरंगी फुलपाखरे. घनदाट झाडी आणि निसर्गरम्य वातावरणामुळे किहीम बीचला 'फुलपाखरांचे नंदनवन' असेही म्हटले जाते.

Kihim Beach | Dainik Gomantak

दुर्मिळ फुलांचे आणि पक्षांचे दर्शन

निसर्गप्रेमींसाठी हा बीच म्हणजे एक मेजवानीच आहे. येथे दुर्मिळ प्रकारची फुले, रानफुले आणि विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षी पाहायला मिळतात, जे फोटोग्राफीसाठी उत्तम आहेत.

Kihim Beach | Dainik Gomantak

साहसी खेळ

साहसी पर्यटकांसाठी येथे पॅरासेलिंग, बनाना राईड, जेट स्की आणि बंपर राईड यांसारख्या जलक्रीडांचा आनंद घेता येतो. कमी गर्दी असल्याने येथे वॉटर स्पोर्ट्सची मजा अधिक येते.

Kihim Beach | Dainik Gomantak

विलोभनीय सूर्यास्त

किहीम बीचवरुन दिसणारा सूर्यास्त अतिशय नयनरम्य असतो. अथांग समुद्राच्या क्षितिजावर मावळणारा सूर्य आणि आकाशात पसरलेले केशरी रंग पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात.

Kihim Beach | Dainik Gomantak

स्वच्छ आणि सुरक्षित किनारा

इतर बीचच्या तुलनेत किहीम बीच अधिक स्वच्छ आहे. हा किनारा सखल असल्यामुळे कुटुंबासोबत आणि मुलांसोबत समुद्रात डुंबण्यासाठी अतिशय सुरक्षित मानला जातो.

Kihim Beach | Dainik Gomantak

स्थानिक कोकणी मेजवानी

किहीम परिसरात अनेक होमस्टे आणि रिसॉर्ट्स आहेत, जिथे तुम्ही अस्सल कोकणी चवीचे मासे आणि उकडीचे मोदक यांसारख्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.

Kihim Beach | Dainik Gomantak

Cucumber Water: नॅचरल ग्लो हवाय? काकडीचं पाणी ठरतं वरदान; उन्हाळ्यातील बेस्ट एनर्जी ड्रिंक

आणखी बघा