Manish Jadhav
दही आरोग्यासाठी जसे फायदेशीर आहे तसेच हानीकारकही आहे.
आज (26 मे) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून रात्री दही सेवनाचे काय तोटे आहेत ते जाणून घेणार आहोत...
रात्री दह्याचे सेवन केल्यास अपचन आणि बद्धकोष्ठता सारख्या पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.
ज्या लोकांना किडनीशी संबंधित समस्या आहेत त्यांनी रात्री अजिबात दह्याचे सेवन करु नये.
दह्यात फॉस्फरस आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे किडनीच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरु शकते.
ज्यांना दुग्धजन्य पदार्थांची ॲलर्जी आहे त्यांनी अजिबात दह्याचे सेवन करु नये.