Manish Jadhav
सकाळी रिकाम्या पोटी चहा आणि बिस्किट खाणे ही आपल्याकडे एक सामान्य सवय आहे, परंतु आरोग्याच्या दृष्टीने ही सवय अत्यंत घातक ठरु शकते.
बिस्किटांमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. सकाळी रिकाम्या पोटी चहा-बिस्किटे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते, ज्यामुळे भविष्यात मधुमेहाचा धोका निर्माण होऊ शकतो.
बिस्किटे प्रामुख्याने मैद्यापासून बनवलेली असतात. मैदा आतड्यांना चिकटतो, ज्यामुळे बद्धकोष्ठता (Constipation), गॅस आणि अपचनासारख्या समस्या उद्भवू शकतात.
बिस्किटांमध्ये 'रिफाइंड कार्बोहायड्रेट्स' आणि 'फॅट्स' जास्त असतात. दररोज सकाळी याचे सेवन केल्याने पोटाचा घेर आणि एकूण वजन वेगाने वाढू शकते.
चहामधील कॅफीन आणि बिस्किटांमधील साखरेचे मिश्रण पोटात ॲसिड तयार करते. यामुळे सकाळी सकाळी छातीत जळजळ होणे किंवा पित्ताचा त्रास होऊ शकतो.
बिस्किटांमध्ये टिकाऊपणासाठी 'पाम ऑईल' किंवा 'ट्रान्स फॅट्स' वापरले जातात. हे घटक शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढवतात, ज्यामुळे हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात.
बिस्किटांमधील चिकट साखर दातांच्या कोपऱ्यात अडकून राहते. चहासोबत ते खाल्ल्याने दातांमध्ये कॅव्हिटी (किडणे) आणि हिरड्यांच्या समस्या वाढतात.
बिस्किटांमध्ये कोणतेही फायबर किंवा प्रथिने (Protein) नसतात. सकाळी शरीराला ऊर्जेसाठी पोषक नाश्त्याची गरज असते, मात्र बिस्किटे केवळ 'एम्प्टी कॅलरीज' देतात.
बिस्किटे खाल्ल्यानंतर थोडा वेळ उत्साह वाटतो, पण काही वेळातच रक्तातील साखर कमी झाल्यामुळे पुन्हा तीव्र भूक लागते. यामुळे 'ओव्हरईटिंग'ची सवय लागते.