Manish Jadhav
दरवर्षी 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा केला जातो. 24 डिसेंबरपासून या खास दिवसाचे सेलिब्रेशन सुरु होते.
ख्रिसमस हा आनंदाचा सण आहे आणि या खास दिवशी लोक एकमेकांना भेटवस्तू देतात. विशेष म्हणजे, हा वर्षातील शेवटचा सण असून प्रत्येकजण या सणाची वाट पाहत असतो.
तो जगभरात वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. या वेबस्टोरीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला जगभरातील ख्रिसमसबद्दलच्या वेगवेगळ्या प्रथांबद्दल सांगणार आहोत, ज्या जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
नॉर्वेमध्ये, लोक ख्रिसमसला त्यांच्या घरात झाडू लपवतात. असे मानले जाते की, झाडूच्या माध्यमातून कोणताही वाईट आत्मा पृथ्वीवर येऊ शकत नाही. ख्रिसमसच्या दिवशी वाईट आत्मे पृथ्वीवर परत येतात आणि जर झाडू लपवला असेल तर ते येत नाहीत.
फिनलंडमधील काही कुटुंबांमध्ये अशी प्रथा आहे की, लोक सकाळी तांदूळ आणि दुधापासून बनवलेले लापशी खातात. ही दालचिनी, दूध किंवा लोणीबरोबर लोक खातात. या पुडिंगमध्ये बदामही लपवलेले असतात आणि ज्याला बदाम आधी सापडतात तो जिंकतो.
कॅनडात ख्रिसमस सेलिब्रेशन खूप खास होते. सांताक्लॉजचे घर कॅनडात असून येथे सांताला पोस्टाद्वारे पत्रे पाठवली जातात, अशी आख्यायिका आहे.