Manish Jadhav
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 14 नोव्हेंबरपासून कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. या मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल एका मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर उभा आहे.
या मालिकेत युवा फलंदाज शुभमन गिल टीम इंडियाचे कर्णधारपद सांभाळताना दिसणार आहे.
शुभमन गिल कसोटी क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात 1000 धावा पूर्ण करण्याच्या अगदी जवळ आहे. सध्या त्याच्या नावावर 979 धावा जमा आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत 21 धावा करताच, गिल 2025 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज बनेल.
गिल सध्या 979 धावांसह 2025 मध्ये कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. या यादीत केएल राहुल (745) आणि यशस्वी जयस्वाल (662) त्याच्या खूप मागे आहेत.
2025 मध्ये गिलने आतापर्यंत केवळ 8 कसोटी सामन्यांमध्ये 15 डावांत 69.92 च्या सरासरीने 979 धावा केल्या आहेत, ज्यात 5 शतके आणि केवळ एक अर्धशतक समाविष्ट आहे.
हा टप्पा गाठल्यास, गिल कसोटी क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात 1000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा भारताचा 14वा फलंदाज बनेल.
एका कॅलेंडर वर्षात भारताकडून सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा विक्रम अद्यापही सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, ज्याने 2010 मध्ये 1,562 धावा केल्या होत्या.