Dharmendra Love Affairs: धर्मेंद्र यांचे नाव जोडले गेलेल्या 'त्या' बॉलिवूड सुंदऱ्या कोण?

Manish Jadhav

धर्मेंद्र

बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र त्यांच्या दमदार अभिनयासोबतच त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत राहिले आहेत.

Dharmendra | Dainik Gomantak

जया बच्चन यांची फॅनगिरी

स्वतः सुपरस्टार जया बच्चन यांनी अनेक मुलाखतींमध्ये कबूल केले की, त्यांनी चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीच त्या धर्मेंद्र यांच्या जबरदस्त फॅन होत्या.

Dharmendra | Dainik Gomantak

दोन विवाह आणि धर्म परिवर्तन

हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्यापूर्वी अभिनेते धर्मेंद्र विवाहित होते आणि त्यांना चार मुले होती. 1980 मध्ये त्यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न केले. त्यासाठी त्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता, दुसरे लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता.

Dharmendra | Dainik Gomantak

रेखा यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध

70 आणि 80 च्या दशकात रेखा आणि धर्मेंद्र यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. दोघांच्या अफेअरच्या चर्चा असल्या तरी धर्मेंद्र यांनी नेहमीच रेखाला आपली चांगली मैत्रीण मानले. त्यांनी एका मुलाखतीत रेखाला 'माझ्या संपूर्ण कुटुंबाची लाडकी' असे म्हटले होते.

Dharmendra | Dainik Gomantak

अनीता राज यांच्याशी लिंकअप

80च्या दशकातील अभिनेत्री अनीता राज यांच्यासोबतही धर्मेंद्र यांचे नाव जोडले गेले. अनेक चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान ते दोघे एकत्र दिसायचे, ज्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते.

Dharmendra | Dainik Gomantak

दिग्गज अभिनेत्रींशी जोडले नाव

रेखा आणि अनीता राज यांच्या व्यतिरिक्त दिलीप कुमार यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानो यांच्यासोबतही धर्मेंद्र यांचे नाव जोडले गेले.

Dharmendra | Dainik Gomantak

नूतन यांच्यासोबतच्या चर्चा

प्रसिद्ध अभिनेत्री नूतन यांच्यासोबतही धर्मेंद्र यांचे नाव जोडले गेले होते. मात्र, धर्मेंद्र यांनी कधीही सार्वजनिकरित्या कोणत्याच अभिनेत्रीसोबतच्या नात्याची बाब स्वीकारली नाही.

Dharmendra | Dainik Gomantak

पहिल्या पत्नीसोबतचे नाते

हेमा मालिनी यांच्याशी लग्न झाल्यानंतरही धर्मेंद्र आजही त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्यासोबतच राहतात. ते दोघे त्यांचा बहुतेक वेळ खंडाळा येथील फार्म हाऊसमध्ये घालवतात.

Dharmendra | Dainik Gomantak

Chanderi Fort: बाबरच्या क्रूरतेची देतो साक्ष; चंदेरी किल्ल्यावरील 800 राण्यांच्या 'जौहर'ची थरारक कहाणी

आणखी बघा