Manish Jadhav
आयपीएल 2025 मध्ये शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघ आतापर्यंत शानदार कामगिरी करत आहे. गुजरातचा संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.
संघाच्या प्रत्येक विजयात टॉप ऑर्डरने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. या तिन्ही फलंदाजांनी मिळून एक नवा विक्रम रचला.
गुजरात टायटन्ससाठी सलामीची जबाबदारी कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन पार पाडत आहेत. यानंतर, जोस बटलर तिसऱ्या क्रमांकावर येतो.
आयपीएलच्या 18 वर्षांच्या इतिहासात एकाच हंगामात एकाच संघाच्या तीन फलंदाजांनी 500 पेक्षा जास्त धावा केल्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी अनेकदा असे घडले आहे की, दोन फलंदाज 500 पेक्षा जास्त धावा करण्यात यशस्वी झाले आहेत.
एवढेच नाही तर यंदा सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत गुजरातची हीच टॉप ऑर्डर टॉप 5 मध्ये आहे.
साई सुदर्शनने गुजरात टायटन्ससाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. साईने यंदा आतापर्यंत 11 सामन्यांमध्ये 509 धावा केल्या आहेत.