Manish Jadhav
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे मालिका सुरु आहे, ज्यातील दुसरा सामना 23 ऑक्टोबर रोजी ॲडलेड येथे खेळला जाईल. पहिल्या पराभवानंतर टीम इंडियाला हा सामना जिंकावाच लागणार आहे.
गिल फ्लॉप
कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) पहिल्या वनडेत केवळ 10 धावा करुन अपयशी ठरला होता. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यांत त्याला मोठी खेळी करण्याची गरज आहे.
शुभमन गिलने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत 2785 धावा केल्या आहेत, म्हणजेच त्याला 3000 धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी केवळ 215 धावांची आवश्यकता आहे.
विक्रम करण्याची संधी
जर गिलने पुढील दोन वनडे सामन्यांमध्ये 215 धावा केल्या, तर तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 3000 धावा पूर्ण करणारा फलंदाज बनण्याचा विक्रम आपल्या नावावर करु शकतो.
गिलने 56 वनडे सामन्यांच्या 56 डावांमध्ये 58.02 च्या सरासरीने 2785 धावा केल्या आहेत. यात 8 शतके आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे.
वनडे फॉर्मेटमध्ये गिलच्या नावावर द्विशतक (208 धावा) देखील आहे, त्यामुळे तो पुढील दोन सामन्यांत मोठी खेळी करु शकतो, अशी अपेक्षा आहे.
पहिल्या वनडेतील कामगिरी
पर्थ येथे झालेल्या पहिल्या वनडेत भारताला 7 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. पावसामुळे बाधित या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी निराशा केली (विराट 0, रोहित 8, गिल 10).
पहिला सामना गमावल्यानंतर गिलवर कर्णधार आणि प्रमुख फलंदाज म्हणून मोठी जबाबदारी आहे. मोठी खेळी करून टीम इंडियाला मालिकेत परत आणण्याचे आव्हान त्याच्यासमोर आहे.