Manish Jadhav
आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल-सप्टेंबर 2025) ह्युंदाई क्रेटा (Hyundai Creta) ही मिड-साईज एसयूव्ही सेगमेंटमध्ये नंबर-1 कार ठरली.
या सहा महिन्यांत ह्युंदाईने एकूण 1,89,751 एसयूव्ही डीलर्सकडे पाठवल्या, त्यापैकी एकट्या क्रेटाने 99,345 युनिट्स (एकूण एसयूव्ही विक्रीत ३६% हिस्सा) विकल्या.
गेल्या वर्षाच्या तुलनेत (YoY) विक्रीत वाढ नोंदवणारी क्रेटा ही ह्युंदाईच्या सहा एसयूव्ही मॉडेल्सपैकी एकमेव कार ठरली.
सप्टेंबर 2025 मध्ये क्रेटाच्या विक्रमी विक्रीमुळे ह्युंदाईच्या एकूण प्रवासी वाहन (PV) विक्रीत एसयूव्हीचा हिस्सा 72% पर्यंत पोहोचला, जो कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठा मासिक आकडा आहे.
क्रेटाने आपल्या जवळच्या प्रतिस्पर्धी महिंद्रा स्कॉर्पिओ N आणि स्कॉर्पिओ क्लासिक (84,634 युनिट्स) पेक्षा 14,711 युनिट्सनी अधिक विक्री केली आहे.
2026 च्या पहिल्या सहामाहीत क्रेटाने FY2025 च्या एकूण विक्रीचा 52% आकडा गाठला आहे, जो जुलै 2015 मध्ये लॉन्च झाल्यापासूनचा सर्वात मोठा विक्रम आहे.
क्रेटाचे पेट्रोल (17.4 किमी/ली) आणि डिझेल (21.8 किमी/ली) मॉडेल अजूनही लोकप्रिय आहेत. कंपनीने लवकरच याचे इलेक्ट्रिक मॉडेलही लॉन्च करण्याची तयारी केली आहे.
क्रेटाच्या बेस मॉडेलची किंमत 10.73 लाख रुपयांपासून सुरू होते, तर टॉप मॉडेलची किंमत 20.20 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.