Pranali Kodre
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 8 नोव्हेंबर 2023 रोजी ताजी वनडे क्रमवारी जाहीर केली होती.
या क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत भारतीय संघाच्या शुभमन गिलने पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे.
गिलने त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच वनडे क्रमवारीत फलंदाजांमध्ये अव्वल क्रमांक पटकावला.
गिल हा आयसीसीच्या वनडे क्रमवारी फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर राहिलेला चौथाच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
यापूर्वी सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि एमएस धोनी या तिघांनाच फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांक मिळवता आला आहे.
सचिन तेंडुलकरने आयसीसी वनडे क्रमवारी 1996 साली अव्वल क्रमांक मिळवला होता.
एमएस धोनीने आयसीसी वनडे क्रमवारीत 2006 साली पहिल्यांदा अव्वल क्रमांक मिळवला होता. तो सर्वात कमी डावात अव्वल क्रमांक मिळणाराही खेळाडू आहे.
विराट कोहलीने आयसीसी वनडे क्रमवारीत 2013 मध्ये अव्वल क्रमांक मिळवला होता.