Manish Jadhav
हळूहळू नाकाद्वारे श्वास घ्या, काही सेकंद रोखा आणि तोंडाद्वारे सोडा. 5-10 मिनिटे हे केल्याने तणाव कमी होतो आणि बीपीही कमी होतो.
कोमट पाणी हळूहळू प्या. शरीरातील फ्लुइड लेव्हल योग्य ठेवणे महत्त्वाचे आहे.
मानेला किंवा कपाळाला थंड पाण्याचा कपडा ठेवा. यामुळे रक्तवाहिन्या रिलॅक्स होतात.
तणाव टाळा, आरामदायी स्थितीत बसा आणि डोळे मिटून रिलॅक्स व्हा.
कॉफी, चहा किंवा एनर्जी ड्रिंक लगेच टाळा. हे बीपी वाढवतात.
केळी किंवा नारळपाणी घ्या. पोटॅशियम बीपी संतुलित करण्यात मदत करतो.
सौम्य स्ट्रेचिंग किंवा थोडे चालणे रक्ताभिसरण सुधारते.