गोमन्तक डिजिटल टीम
मडकईचा श्री नवदुर्गा देवीचा वार्षिक जत्रोत्सव भाविकांच्या अमाप उपस्थितीत व उत्साहात साजरा झाला
या जत्रोत्सवाची रथोत्सव व इतर धार्मिक कार्यक्रमांनी सांगता झाली.
रथोत्सवाला भाविकांची मोठी उपस्थिती लाभली होती.
उत्सव काळात मयुरासन, गरुडासन, सुखासन, तसेच पालखी उत्सव, नौकाविहार व सांस्कृतिक कार्यक्रम झाले.
मंदिरात विविध धार्मिक विधीही संपन्न झाले.
गुढ्यातोरणांनी सजवलेल्या रथात देवीची स्थापना करण्यात आल्यानंतर मंदिराच्या प्राकाराभोवती रथ नाचवण्यात आला.
दहा वाजता सुवासिनींतर्फे दिवजोत्सव साजरा करण्यात आला. संध्याकाळी रथोत्सवाने या उत्सवाची सांगता झाली.