गोमन्तक डिजिटल टीम
गोवन पद्धतीची मंदिरे पाहणे हा पर्यटकांसाठी एक वैशिष्ट्यपूर्ण अनुभव असतो. अशाच एक खास मंदिराची आपण माहिती घेऊ.
गोवन वास्तुकलेचा नमुना असलेले हे श्री ब्रम्हदेवाचे मंदिर करमळी या सुंदर गावामध्ये वसलेले आहे.
शांत वातावरण, सुंदर वास्तूमुळे हा परिसर पर्यटकांना भावतो. या परिसरात भरपूर झाडेही आहेत.
ब्रम्हदेवांच्या मोजक्याच मंदिरापैकी हे जुने मंदिर इथे अस्तित्वात असल्याने या परिसराला ब्रम्हा करमळी म्हणून ओळखले जाते.
अतिशय दुर्मिळ पद्धतीची मूर्ती या मंदिरात पाहायला मिळते. श्री ब्रम्हदेवांसोबत भगवान विष्णू आणि शंकराच्या अस्तित्वामुळे या जागेचे धार्मिक महत्व वाढते.
हे मंदिर गोव्याची राजधानी पणजीपासून ५५ किमी अंतरावर आहे. मंदिरात जाण्यासाठी तुम्ही बस किंवा टॅक्सी घेऊ शकता.
सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत या मंदिराला तुम्ही भेट देऊ शकता.
जाणून घ्या 'या' पुरातन नागमंदिरांचा अद्भुत इतिहास