गोमन्तक डिजिटल टीम
भारतीय संस्कृतीमध्ये नागाला अनन्यसाधारण महत्व आहे. नाग या सरपटणाऱ्या प्राण्याला आपण शेतकऱ्याचा मित्र म्हणूनही ओळखतो.
नागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्याच्या देवरूपाला वंदन करण्यासाठी श्रावणातील पहिला सण हा नागपंचमी असतो.
भारतात अनेक ठिकाणी नागदेवतेची मंदिरे आहेत. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर आपण यातील महत्वाच्या मंदिरांची माहिती घेऊ.
३००० वर्षे जुने हे हरिपाद केरळ येथील मंदिर देशातील प्रमुख नागराज मंदिर मानले जाते. मंदिराच्या आवारात नागांची महती सांगणाऱ्या हजारो मूर्त्या आहेत.
गुजरातच्या सीमेवर भुजिया टेकडीवर नागा वंशातील लोकांनी हा किल्ला बांधला. स्थानिकांनी हे मंदिर बांधले. हा किल्ला सध्या भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे.
नागदेवतेच्या असंख्य मूर्त्या असलेले हे मंदिर तमिळनाडूतील नागरकोइल शहरात आहे. या मंदिरातील नागदेवतेला पाच फणे दाखवलेले आहेत ज्यामागे एक आख्यायिका आहे.
मानसरोवर, जम्मू काश्मीर येथे हे अद्भुत शेषनाग मंदिर आहे. या सुंदर परिसरात शेषनाग आजही वास्तव्यास आहेत असे लोक मानतात.
हे अज्ञात आणि गूढ मंदिर दावणगिरी, कर्नाटकपासून जवळ आहे. मंदिराजवळ सोनेरी सर्पाच्या कथेमुळे हे मंदिर विलक्षण मानले जात आहे.
जवळ येतोय गोव्याचा 'रंगीबेरंगी' फेस्टिवल! पाहा कोणता ते...