Kelyanchi Jatra: गोव्यातील प्रसिद्ध 'केळ्यांच्या जत्रेचे' खास फोटोज

Akshata Chhatre

केळ्यांची जत्रा

श्री देव बाबरेश्वर यांची जत्रा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात आयोजित केली जाते. याला "केळ्यांची जत्रा" किंवा "घडांची जत्रा" म्हणूनही ओळखले जाते.

Goa Culture | Dainik Gomantak

श्री देव बाबरेश्वर

या जत्रेत भक्त श्री देव बाबरेश्वर यांना संपूर्ण केळ्यांचा घड अर्पण करतात. एक दिवसात २५०० पेक्षा जास्त घड अर्पण केले जातात.

Goa Culture | Dainik Gomantak

आकर्षक छत

अर्पण केलेले केळ्यांचे घड एकत्र करून देवतेच्या मूर्तीजवळ लाकडी माटोळीला बांधले जातात, ज्यामुळे केळ्यांच्या घडांचे सुंदर आणि आकर्षक छत तयार होते.

Goa Culture | Dainik Gomantak

लिलाव

उर्वरित केळ्यांच्या घडांचा संध्याकाळी लिलाव केले जातो, ज्यामुळे जत्रा आणखीन आकर्षक बनते.

Goa Culture | Dainik Gomantak

आमदार मायकल लोबो

जत्रेनिमित्त यंदा देवस्थान अध्यक्ष चंद्रकांत चोडणकर सोबत आमदार मायकल लोबो व इतरांनी दर्शन घेतले.

Goa Culture | Dainik Gomantak

जत्रोत्सव

येथील जागृत श्री देव बाबरेश्वराच्या जत्रोत्सवाला सुरुवात झाली असून केळ्यांची जत्रा म्हणून हा जत्रोत्सव ओळखला जातो.

Goa Culture | Dainik Gomantak

भाविक

यावर्षी भाविकांनी नवसासाठी दिलेल्या ५ हजारांहून अधिक केळ्यांचे घड देवाला अर्पण करण्यात आले आहेत.

Goa Culture | Dainik Gomantak
पिंपल हटवण्याचे उपाय