IPL 2025: धोनी अन् रोहितला जे जमलं नाही ते अय्यरनं करुन दाखवलं; असा पराक्रम करणारा बनला पहिला कर्णधार

Manish Jadhav

आयपीएल 2025

आयपीएल 2025 च्या क्वालिफायर-2 सामन्यात पंजाब किंग्जने शानदार कामगिरी करत मुंबई इंडियन्सचा 5 विकेट्सने पराभव केला.

Shreyas Iyer | Dainik Gomantak

श्रेयस अय्यर

या विजयासह श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कमाल करणाऱ्या पंजाबने आयपीएल 2025 च्या फायनलमध्ये धडक मारली. आता फायनलमध्ये पंजाब किंग कोहलीच्या आरसीबीशी मंगळवारी (3 जून) भिडणार आहे.

Shreyas Iyer | Dainik Gomantak

शानदार खेळी

मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना 203 धावांचा डोंगर उभारला होता. पण पंजाब किंग्जच्या फलंदाजांनी हे लक्ष्य सहज गाठले. या विजयाचा नायक संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर ठरला, ज्याने शानदार अर्धशतक झळकावले. त्याच्याशिवाय नेहाल वढेरा आणि जोस इंग्लिश यांनीही महत्त्वाच्या खेळी खेळल्या.

Shreyas Iyer | Dainik Gomantak

खास रेकॉर्ड!

मुंबईविरुद्धच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर अय्यरने खास रेकॉर्ड नावावर केला. तो आयपीएलच्या इतिहासात तीन वेगवेगळ्या संघांना फायनलमध्ये घेऊन जाणारा पहिला कर्णधार बनला.

Shreyas Iyer | Dainik Gomantak

श्रेयसचा धमाका

2020 मध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्स, 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि आता 2025 मध्ये पंजाब किंग्जला फायनलमध्ये श्रेयस घेऊन आला.

Shreyas Iyer | Dainik Gomantak

श्रेयसने करुनच दाखवलं

श्रेयसच्या नेतृत्त्वाखाली पंजाबने यंदाच्या हंगामात शानदार कामगिरी केली. पॉइंट्स टेबलमध्ये संघाने अव्वल स्थान पटकावले. एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांनी आजपर्यंत जे केले नाही ते श्रेयसने करुन दाखवले.

Shreyas Iyer | Dainik Gomantak

अफलातून खेळी

कर्णधार श्रेयसने 27 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याने मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने 41 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकारांसह 87 धावांची अफलातून खेळी खेळली.

Shreyas Iyer | Dainik Gomantak
आणखी बघा