Sameer Amunekar
प्रिंटेड कपडे कॅज्युअल लुकसाठी प्रसिद्ध असले तरी, योग्य प्रकारे स्टाइल केल्यास ते खूपच ग्लॅमरस आणि एलिगंट दिसू शकतात.
प्रिंटेड टॉप असेल तर त्याला सॉलिड कलरचा ट्राउझर, स्कर्ट किंवा पलाझो पेअर करा. यामुळे प्रिंटचा फोकस ठरतो आणि ओव्हरलोड वाटत नाही. हे कॉम्बिनेशन नेहमीच बॅलन्सड आणि स्टायलिश दिसतं.
मोठे हूप्स, लेयर नेकलेस, स्टेटमेंट रिंग्स यांचा वापर करून लूकला ग्लॅम टच द्या. मात्र अॅक्सेसरीज ओव्हर न करता, कपड्यांच्या प्रिंटप्रमाणे मिनिमल किंवा बोल्ड निवडा.
प्रिंटेड ड्रेसला हाय हील्स किंवा स्ट्रॅपी सँडल्स जोडल्यास लूक अपग्रेड होतो. फ्लॅटस पेक्षा थोडा उंचीचा टच दिल्यास ग्लॅमरस इफेक्ट वाढतो.
प्रिंटेड ड्रेसवर सॉलिड रंगाचा ब्लेझर किंवा श्रग टाका. ऑफिस, पार्टी किंवा कॉकटेल इव्हेंटसाठी हा लूक परफेक्ट ठरतो.
ग्लॉसी लिपस्टिक, विंग्ड आयलाइनर, आणि सटल ब्लश वापरा. हेअरमध्ये स्लीक पोनीटेल, वेव्ही कर्ल्स किंवा स्टायलिश बन हे लूकला पूर्णता देतात.