पृथ्वीच्या कॅनव्हासवर श्रावणातील रंगांची उधळण म्हणजे 'गोव्याचा निसर्ग'

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यातील श्रावण

श्रावण महिना सुरु झाल्यावर पावसाचा जोर कमी होतो. कोवळे ऊन पडू लागते आणि निसर्गाच्या रंगात रंगलेला गोवा आणखी सुंदर दिसतो.

हिरवीगार जंगले

पाचूच्या रंगांप्रमाणे गोव्यातील जंगले हिरवीगार दिसू लागतात. कोवळ्या किरणांत हा रंग आणखीन ताजातवाना दिसू लागतो.

निरभ्र आकाश

श्रावणात आभाळ हळू हळू निरभ्र होऊ लागते. मोकळ्या आकाशात गोव्याच्या लँडस्केपचे सौंदर्य प्रतिबिंबित झाल्याचा भास होऊ लागतो.

रंगीबेरंगी फुले

श्रावणाची चाहूल लागताच पठारे, कडेकपाऱ्या हळूहळू पिवळ्या, लाल, जांभळ्या अशा विविधरंगी फुलांनी भरू लागतात.

तपकिरी पॅलेट

पाऊस कमी झाल्याने खासकरून ग्रामीण भागातले लाल तपकीरी रस्ते गोव्याच्या सौन्दर्यात आणखी भर घालतात.

पोपटी रंगात न्हालेली शेती

दूरवर पसरलेली पोपटी रंगाची शेती डोळ्यांसाठी एक आनंददायी दृश्य असते. गोव्यातली भातशेती विशेष सुंदर दिसते.

निळेशार पाणी

पावसाचा जोर कमी येत जातो तसेतसे नद्या आणि समुद्र आपल्या मूळ रुपाकडे परततात. हा स्वच्छ निळा रंग मनःशांती मिळवून देतो.

बहुरंगी सूर्यास्त

निरभ्र आकाशामुळे सूर्यास्तावेळी पिवळ्या, भगव्या, गुलाबी रंगांची उधळण सुरु असते. हा नैसर्गिक रंगांचा खेळ अद्भुत असतो.

पिकनिकसाठी गोव्यातील हे 'खास ठिकाण' तुमच्यासाठी..

आणखी पाहा