Akshata Chhatre
श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार सर्वात पवित्र आणि सात्त्विक मानला जातो.
या महिन्यात धार्मिकता, संयम आणि आत्मशुद्धतेला विशेष महत्त्व दिलं जातं.
श्रावणात उपवास, शिवपूजन, मंगळागौरीची पूजा, हरितालिका व्रत यांसारख्या पारंपरिक कृती आचरल्या जातात.
फळं, दूध, मूग, साबुदाणा यांचं सेवन केलं जातं, तर मांसाहार, मद्यपान, मसालेदार अन्न आणि रात्रजागरण टाळावं अशी परंपरा आहे.
या काळात दररोज लवकर उठून स्नान करून ‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा जप करत शिवपूजन केल्याने मानसिक शांती लाभते.
महिलांनी मंगळागौरीचं व्रत करून श्रद्धेने पूजा करावी.
ध्यान, योग आणि निसर्गसंगतीत वेळ घालवल्यास शरीर आणि मन अधिक निर्मळ आणि सकारात्मक बनतात.