Akshata Chhatre
आयुष्यातली अनेक नाती आपल्यासाठी महत्त्वाची असतात, पण पती-पत्नीचं नातं हे त्यांच्या जवळिकेमुळे आणि वेगळ्या गूढ बंधामुळे सर्वांत विशेष ठरतं.
हे नातं केवळ एका सामाजिक करारापुरतं मर्यादित नसतं, तर त्यात प्रेम, विश्वास, संवाद, समजूतदारपणा आणि परस्पर सन्मानाचे धागे गुंफलेले असतात.
मोकळेपणाने बोलणं, एकमेकांच्या सीमा समजून घेणं, आणि त्या सीमांचा आदर करणं हे घट्ट नात्याचं अधिष्ठान असतं.
वाद हे प्रत्येक नात्याचा भाग असतात, पण त्यांचा शेवट समाधानाने होणं गरजेचं आहे. भांडण वादात न बदलता संवादातून समजुतीकडे नेणं हे यशस्वी नात्याचं लक्षण आहे.
एकमेकांना व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि स्वतःच्या ध्येयांसाठी जागा देणं हेही प्रेमाचंच रूप आहे.
पती-पत्नीच्या या बंधाला अधिक दृढ करण्यासाठी प्रेम, विश्वास आणि संवाद हाच खरा मंत्र आहे.
नात्याचा पाया ‘विश्वास’ असतो. जो कायम राहिला, तर कुठलंच वाद किंवा अडथळा हे नातं तोडू शकत नाही.